TAPहा संकल्प आहे, तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती आपण जाणून घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे. ‘तुम्ही आम्ही पालक’ मासिकाची आम्ही ११ उद्दिष्टे निश्चित केली आहेत. ती अशी:

१. शासनाने आणि सर्व समाजाने महाराष्ट्रात पालक दिन साजरा करण्यास सुरवात करावी.
२. महाराष्ट्रातील पालकांत जाणीव जागृतता होण्यासाठी प्रत्येक गावात ‘तुम्ही आम्ही पालक’चा अंक पोचविणे.
३. शाळा महाविद्यालयांतील फी वाढीवर नियंत्रण ठेवणे.
४. स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांनी आनंदाने सामोरे जावे, असे वातावरण निर्माण करणे.
५. शिक्षण हक्क कायदा प्रभावी करणे.
६. शिक्षणातील पालकांचा सहभाग वाढविणे.
७. पालक – पाल्य सुसंवादासाठी पोषक वातावरण तयार करणे.
८. पालक प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
९. पालक – शिक्षक संघ प्रभावी करणे.
१०. बालसंगोपनाची जाणीव जागृती निर्माण करणे.
११. कौटुंबिक नातेसंबंध वृद्धींगत करणे.

केवळ उद्दिष्टच नव्हे तर ती कशी साध्य करायची, याचे नियोजनही आम्ही केले आहे. पालकत्व आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेले सर्व प्रकारचे शिक्षण याचा सर्वव्यापी विचार या नियोजनात करण्यात आला आहे. पालकत्व म्हणजे घरात आईवडील, शाळेत शिक्षक, घराबाहेर समाज जे संस्कार करतात ते. मानवी जीवनातील पालकत्व हे असे व्यापक आहे. या पालकत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि समाजाला या भूमिकेचे महत्व पटविण्यासाठी समाजासमोर पालकत्वाचा आदर्श घालवून देणाऱ्या दाम्पत्यास याच वर्षीपासून ‘महापालक’ हा सन्मानही देण्याचे आम्ही ठरविले आहे. असा हा पहिला महापालक सन्मान ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आणि मंदाताई यांना प्रदान करण्याचे भाग्य आम्हास आम्हास लाभले आहे.

२० कलमी कार्यक्रम (Concept)

 • १. पालकांनी मुलांवर संस्कार कसे करावेत.
 • २. मुलांकडून घरी अभ्यास कसा करून घ्यावा.व मुलांसाठी अमूल्य वेळ कसा दयावा.
 • ३. परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वास कसा वाढवावा.
 • ४. इयत्ता ४ थी, ७ वी शिष्यावृत्तीसाठीची माहिती
 • ५. इ. १० वी व १२ वी या महत्त्वाच्या वर्षात घ्यावयाची काळजी
 • ६. शिक्षण पद्धतीतील समस्यांची जाण होण्यासाठी काय करावे.
 • ७. शिक्षण शेत्रातील घडामोडींची / धोरणांची महत्वपूर्ण माहिती
 • ८. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना नेमके काय केले पाहिजे.
 • ९. शिक्षक-पालक-विदयार्थी या त्रिकोणातील सुसंवाद.
 • १०. शिक्षणासाठी योग्य आर्थिक गुंतवणूक.
 • ११. सुजाण पालकांचे संघटन.
 • १२. आवडीनुसार शेत्र कसे निवडावे या संदर्भात उत्त्तम मार्गदर्शन.
 • १३. आदर्श पालकांची चरित्रे व मुलाखती
 • १४. आदर्श शिक्षक कसा असावा?
 • १५. आदर्श शाळा व शैक्षणिक प्रयोगांची माहिती
 • १६. सुटीतील पालकत्व
 • १७. विविध शैक्षणिक साधनांची माहिती
 • १८. सुजाण नागरिक घडविताना
 • १९. आजी, आजोबा व नातवंडांचा संवाद
 • २०. शैक्षणिक शेत्रातील समस्यांविषयी इष्ट व व्यवहार्य भूमिका काय असावी या संदर्भातील तज्ञांचे मार्गदर्शन व उपाययोजना

Concept by Harish Butle

founder

Mission

' हा संकल्प आहे '

तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती आपण जाणून घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.

Polls

"तुम्ही आम्ही पालक" हा अंक तुम्हाला आवडतो का ?

View Results

Loading ... Loading ...

DEEPER