जागतिक पालकदिनाचे औचित्य साधून , प्रथम अंक रविवार , दि. २८ जुलै २०१३ रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त व सुप्रसिध्द समाजसेवक दांपत्य डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला.

पालकांनी मुलांसाठी निरपेक्ष काम करायचे असते, असे मुलांनी गृहीत धरले आहे. मात्र, पालकांनी आपल्या निरपेक्ष कामाची मुलांना जाणीव करून दिल्यास भविष्यात वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
सर फाउंडेशनच्या वतीने देशात पहिल्यांदाच सार्ज‍या होत असणार्‍या पालक दिनानिमित्त पहिला महापालक सन्मान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना देण्यात आला. या वेळी डॉ. आमटे बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी आमटे, राज्याचे सांस्कृतिक व पर्यावरणमंत्री संजय देवतळे, सिंबायोसिस संस्थेचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, लेखक प्रसाद मिरासदार, फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश बुटले या वेळी उपस्थित होते.

सामाजिक कार्य हे संसर्गजन्य आहे का, यासंदर्भात बोलताना डॉ. आमटे म्हणाले, ”पालकांनी करिअर निवडीबाबत मुलांवर दबाव आणू नये. आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करावे असे बाबांना वाटायचे; मात्र त्यांनी आमच्यावर कधी दबाव आणला नाही. आमच्या मुलांवर करिअर निवडीबाबत आम्ही दबाव आणला नाही, मात्र त्यांनी देखील सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

देवतळे म्हणाले, ”राहणीमान, संस्कार आणि सभोवतालच्या वातावरणात मुले घडत असतात. मात्र पती-पत्नी काम करत असल्यामुळे पाल्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आजच्या महाजालामध्ये मुले वाहून जाऊ नयेत, यासाठी पालकांनी जागृत असणे गरजेचे आहे.”


महापालक पुरस्कार वितरण प्रसंगी (डावीकडून) हरिश बुटले, मंदाकिनी आमटे, प्रकाश आमटे, संजय देवतळे, शां. बा. मुजुमदार

पहिला अंक (PDF) Download करून घेण्यासाठी येथे Click करा !

Concept by Harish Butle

founder

Mission

' हा संकल्प आहे '

तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती आपण जाणून घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.

Polls

"तुम्ही आम्ही पालक" हा अंक तुम्हाला आवडतो का ?

View Results

Loading ... Loading ...

DEEPER