FAIR EXCELLENT REASONABLE
Subscribe Now
Concept By

Mr.Harish Butle

' हा संकल्प आहे '

तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती आपण जाणून घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.

Feedback

अनिल अवचट
शशिक्षण ही आपली चुकलेली वाट आहे हे आता लोकांना कळू लागलेलं आहे. अभ्यासाचं ओझं आणि प्रचंड प्रमाणात असलेली स्पर्धा यांचा तान पालकांवरही तेवढाच जास्त आहे. मात्र या व्यवस्थेला नकार देण्याचं धाडस त्यांच्यात नाही. या मासिकाद्वारे विचारमंथन व्हावं, लोकांना आपले विचार मांडण्याची मोकळीक मिळावी असा मला वाटत. `तुम्ही आम्ही पालक' या मसिकास माझ्या मनापासून शुभेच्छा.

विनायकदादा पाटील
शिक्षण विषय डोळ्यासमोर ठेवून पालकांसाठी अशा प्रकारचे मासिक सुरू होतं आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारचं लिखाण लोकांसमोर येणं आवश्यक आहे. मात्र अनेकदा सुरुवात खूप जोरात होते आणि नंतर त्यात सातत्य राहत नाही. तेव्हा हे सातत्य राहील ही अपेक्षा करतो. हा विषय समाजहिताचा आहे. `तुम्ही आम्ही पालक' या मसिकास माझ्या हर्दिक शुभेच्छा.

भाऊ गावंडे
आज समाज सरळ सरळ दोन भागात विभागला गेला आहे. श्रीमतांची मुलं पंचतारांकित शाळांमध्ये सर्व सुविधांनी युक्त असं शिक्षण घेत आहेत. शिक्षणानंतर त्यांनाच सगळ्याच क्षेत्रात प्रवेश असणार आहे. ही मुलं एका वेगळ्या बेटावर, आयसोलेटेड राहिल्या मुळे गरीबांचं जगणं, त्यांचे प्रश्‍न याविषयी ते अनभिज्ञ किंवा माहिती असली तरी घेणंदेणं नसलेले आहेत. तर दुसर्‍या बाजूला फार मोठा वर्ग नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शिकतो आहे. यांना मिळणार्‍या सुविधाही तितकयाच मर्यादित आणि सीमित असल्यामुळे ते या पहिल्या वर्गाशी कधीही बरोबरी करू शकत नाही. त्यांच्यातलं अंतर हे वाढणारंच आहे. पालक म्हणून मला असं वाटतं की माझ्या मुलाला सगळ्यांप्रमाणे शिक्षण मिळालं पाहिजे. माझ्या घराजवळची शाळा - तिथे त्याला प्रवेश मिळालाच पाहिजे. त्यात स्तर असता कामा नयेत. तरच अशा दोन भागात समाज विखुरला जाणार नाही आणि समाजात एकोपा नांदेल. आणि राईट टु एज्युकेशनचा खरा अर्थ तेव्हाच साकारला जाईल. यासाठी पालकांच्या समस्यांना वाचा फोडणारं, त्या प्रश्‍नावर चर्चा करणारं आणि पालकांचे दबावगट निर्माण करणारं मासिक आज हवंच आहे. ‘तुम्ही आम्ही पालक मिळून एकत्र येऊया. ‘तुम्ही आम्ही पालक’ साठी मनापासून शुभेच्छा.

वसंत काळपांडे
केंद्र शासनआणि महाराष्ट्र शासन यांची धोरणे, देशाच्या विविध राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी, इतर देशांमध्ये काय चालले आहे त्याचा आढावा आणि या सर्वांवरील भाष्य या मासिकात असेल असे मी गृहीत धरून आहे आणि तसे असावेही. एकदा मासिक बाहेर पडल्यानंतर वाचकांना काय वाटते त्याचा फीडबॅक घेऊन मासिकाच्या प्रवासाची पुढची दिशा ठरवता येईल. या नवीन मासिकाला ‘तुम्ही आम्ही पालक’साठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!

विद्या बाळ
आजच्या तरूण मुलांशी संवाद साधताना आजचा पालक कमी पडतो आहे. ही जनरेशन गॅप तो भरून काढण्यास तो असमर्थ ठरतो आहे. आजची तरूण पिढी खूपच सक्षम आहे. पण आम्ही पालक कमी पडतो आहोत याचं कारणच मुळी आडात नाही तर पोहो-यात कुठून येणार? अशा प्रकारच्या मासिकाची आज अत्यंत आवश्यकता आहे. कारण आजच्या मुलांचे प्रश्न हाताळणं आम्हाला जमत नाहीये. खूपदा पालक मुलांना म्हणतात, आम्ही अनेक पावसाळे बघितलेत, पावसाळे नुसते बघून उपयोग नाही, तर बदलती आव्हानात्मक परिस्थिती समजून घेणंही गरजेचं आहे. मुलांसमोर येणा-या खडतर आव्हानांपुढे पालकांनी भयभीत होता कामा नये. आज मुलांना काय द्यायचं आणि काय द्यायचं नाही हे आम्हाला कळत नाहीये. अशा पालकांनी या मासिकातून बोलावं - नव्हे अशा पालकांशी या मासिकाने बोलावं. आजच्या पालकांसाठी कार्यशाळा घेण्याची आवश्यकता मला वाटते. हे मासिक अशा प्रकारच्या अपेक्षा पूर्ण करेल या आशेसह `तुम्ही आम्ही पालक' या मासिकास खूप खूप शुभेच्छा.

राजीव तांबे
आपली मुलं अशी का वागतात? अचानक त्यांचं काय बिनसलंय? ते आमचं काही ऐकूनच का घेत नाहीत? आता त्यांच्यांशी कसं जुळवून घ्यावं?’ हे अनेक पालकांना कळतच नाही, कारण पालक असतात ’विंडोज् ९५’ मधे तर मुले असतात ’विंडोज् १०’ मधे! त्यामुळे पालकांचे अनेक प्रोग्रॅमस् ’विंडोज १०’ स्वीकारतच नाही आणि मग पालकांची तगमग वाढते. अशावेळी पालकांनी अपग्रेड होणं व नवीन गोष्टी डाउनलोड करून घेणं अपेक्षित आहे. खरं म्हणजे, या मसिकाकडून हीच अपेक्षा आहे. प्रेमाची अत्त्युच्च पातळी शिक्षा करणं नव्हे तर समजून घेणं आहे. आपल्या मुलाची चूक समजून घेऊन त्याला चुकातून शिकण्याची संधी देणं हा पालकत्वाचा एक पैलू झाला. सुजाण पालकत्वाच्या अशा अनेक गोष्टी, निरनिराळे विषय हे मासिक घराघरात पोहोचवणार आहे. आणि यातूनच ’शिक्षण कुटुंबांची’ एक विशाल साखळी तयार होणार आहे. म्हणूनंच हे मासिक ’फक्त पालकांसाठीच’ असं नाही तर हे प्रत्येक सुजाण कुटुंबातलं एक सदस्य आहे. तुम्ही आम्ही पालकला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.

Our Social Initiative

GET INVOLVED IN OUR TOP CLASS SOCIAL INITIATIVE

DEEPER
MahaExam
Tumhi Aamhi Palak
Saad Manuskichi